श्री रामेश्वर मंदिराच्या शतक महोत्सव पदार्पणानिमित्त दिनांक ०८ व ०९ मार्च २०२५ रोजी दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी महिला दिनाचे औचित्य साधून “ममता संकल्प” महिला भजनी मंडळाचा भजन आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम मंदिरासमोरील पटांगणात (बालोद्यानात) संपन्न झाला. भक्तिगीतांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिभावाने निनादला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांचे सुगंधी उत्तर व गुलाबपुष्प देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी “स्वरांजली” हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश आजगावकर यांनी उत्तम रीतीने पार पाडले. के.जी.एस. सोसायटीतील गुणी कलाकारांनी – मनोज वाघ, विदुला कामत, दिलीप कुलकर्णी, मीनाक्षी वाडेकर, जयश्री तेलंग, प्रदीप दाभोळकर, वसुधा कामत, वर्षा रुद्रवार, विद्या मुरकुंडे, मेधा सोहनी व डॉ. जय आजगावकर – यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सागर कांबळी ह्यांनी केले होते. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली व कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दोन्ही दिवस मंदिर परिसर आनंद, भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहाने भरून गेला होता.
एकूणच, शतक महोत्सवाच्या प्रारंभी आयोजित हे कार्यक्रम मंदिराच्या गौरवशाली परंपरेला शोभणारे आणि संस्मरणीय ठरले.
